मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कुमार यज्ञा जगदीश दुसाने (वय 4) या निरागस चिमुकलीवर प्रथम अत्याचार करून त्यानंतर निर्घृणरीत्या हत्या करण्यात आली. या क्रूर आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या गुन्ह्याच्या विरोधात संपूर्ण समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी नाशिकजिल्हाधिकारी व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सुपूर्त केले.
संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. पोपट आत्माराम पताडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवेदन मोहिमेत खालील मान्यवर उपस्थित होते —
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. मधुकर मुरलीधर भोर,
नाशिक जिल्हा सोशल मीडिया सेल अध्यक्ष श्री. ऋषिकेश नारायण वाबळे,
नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री. अंकुश श्रावण गुंजाळ,
नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ. वनिता गणेश सोनावणे,
नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख सौ. सुरेखा अशोक जगताप,
नाशिक तालुका महिला आघाडी अध्यक्ष सोनाली गणेश जुद्रे,
इगतपुरी तालुका अध्यक्ष अक्षय दगु राव,
इगतपुरी तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ. भारती संतोष नाठे,
मालेगाव तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ. कविता संदीप कदम,
मालेगाव तालुका अध्यक्ष अंकित भास्कर पवार.
प्रतिष्ठानने प्रशासनाला साकडे घालत म्हटले की—
“अशा भयानक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तात्काळ व कठोर शिक्षाच समाजातील गुन्हेगारांना रोखू शकते. पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे.”
निवेदनाद्वारे तात्काळ कायदेशीर कारवाई वाढवण्याची मागणी करण्यात आली.
0 Comments