३ वर्षांच्या यज्ञा दुसाने प्रकरणात शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानची धडक भूमिका; पंतप्रधानांसह सात उच्चस्तरीय कार्यालयांना ई-मेलद्वारे


नाशिक / मुंबई :
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षांची चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानवी अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेविरुद्ध शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तर्फे तातडीची कार्यवाही व न्याय मिळवून देण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

या संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. पोपट आत्माराम पताडे यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्यातील सात महत्वाच्या कार्यालयांना अधिकृत ई-मेलमार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे. या निवेदनात पीडित कुटुंबाला संरक्षण, आर्थिक-सामाजिक मदत, वेगवान तपास, कडक शिक्षा आणि सरकारी यंत्रणांचे समन्वय यांसाठी मागण्या करण्यात आल्या आहेत.

ज्या उच्चस्तरीय कार्यालयांना निवेदन पाठवण्यात आले:
1. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार
2. मा. केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार
3. मा. मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली
4. अध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), भारत
5. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
6. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य
7. महाराष्ट्र राज्य महिला आयोग

मुख्य मागण्या :

पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ कायदेशीर संरक्षण व मदत मिळावी.

संपूर्ण प्रकरणाचा जलदगती तपास करून कठोर शिक्षा व्हावी.

आरोपीवर कठोरात कठोर दंडात्मक कारवाई करून प्रकरण फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवावे.

कुटुंबाला वैद्यकीय, मानसिक व आर्थिक मदत त्वरित पुरवावी.

केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने न्यायप्रक्रिया गतिमान करावी.

समाजातील इतर मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी.


Post a Comment

0 Comments