शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीसाठी कार्य करणारी युवा संस्था आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक युवकामध्ये स्वराज्याची प्रेरणा जागवणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.
संस्थेचे मुख्य उद्दिष्ट —
👉 समाजातील दुर्बल, गरजू व मागास घटकांना न्याय, शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
👉 युवकांमध्ये नेतृत्वगुण, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित करणे.
👉 महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, रक्तदान, स्वच्छता अभियान, आणि ग्रामीण विकास अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
👉 “गड-किल्ले मोहीम” राबवून महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता आणि त्यांचा वारसा जपण्याचे कार्य करणे.
👉 युवाशक्तीद्वारे इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे जतन करणे.
संस्था पूर्णपणे अराजकीय असून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून “सशक्त युवक – सशक्त समाज – सशक्त महाराष्ट्र” हे ध्येय साध्य करण्यासाठी कार्यरत आहे.
संस्थापक अध्यक्ष:
🎖️ श्री. पोपट आत्माराम पताडे
घोषवाक्य:
🚩 “जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे!”
.jpg)
0 Comments